नविन घर दुसऱ्या मजल्यावर होते. त्यामुळे त्याला ग्यालेरी होती एक. तिथेच दाणे व पाणी ठेवायची जागा केली. यावेळी ज्याचा कधी विचारही केला नव्हता ते पाहायला मिळाले. १-२ पोपट यायला लागले आणि हळूहळू ४-६-७ पोपट जमायला लागले. ग्यालेरीजवळ नारळाचे झाड होते तिथे फांदीवर काही विजेच्या तारांवर येउन बसायचे. हळूच कोणी नाही याचा अंदाज घेत कट्ट्यावर यायचे. सकाळ,दुपार,संध्याकाळ पोपट येउन बसायचे. चिमण्यांसाठी जे तांदूळ ठेवायचो ते पोपट खायचे. अगदी कडकड आवाज करत. मग त्यांच्यासाठी खास रेशनचे तांदूळ आणून ठेवायचो. पोपटाला हिरवी मिरची, पेरू आवडतो म्हणतात पण हे पोपट ते सोडून फक्त तांदूळ खात होते.
एका पोपटाला गळ्यावर लाल डाग होता. त्याला दुसरा पोपट खाऊ दयायचा नाही. जवळ आला कि चोच मारायचा. तांदूळ संपले कि पोपट खूप आवाज करायचे. सकाळी तर सारखा पोपटांचाच आवाज असायचा. कबुतरे,पारवे, बुलबुल पक्षी,साळुंक्या, चिमण्यापण यायला लागल्या. कबुतरांना पोपट घाबरायचे. ते पोपटांना खाऊ द्यायचे नाही. उडवून लावायचे.
खारुताई अजून आली नव्हती. यावेळी खिडकीतून खूप videos आणि photos काढले. हळूहळू ते आम्ही असताना यायचे पण घाबरतच आणि लगेच उडून जायचे. नारळाच्या फांदीवर बसून वाट पाहायचे आम्ही जाण्याची. घरी येणाऱ्या प्रत्येकाला मजा वाटायची पोपट पाहायला. हे घर सोडण्याच्या काही दिवस आधी खारुताई आली होती एक दोनदा.त्याचबरोबर भारद्वाज सुद्धा खूप वेळा येउन गेला. तो पोळी खायचा. कावळापण पोळी खायचा पण ती पोळी तो पाण्यात बुडवून खायचा.
ग्यालेरीसमोर मस्त गुलमोहर फुललेला असायचा. त्याच्याखाली बिट्टीच्या पिवळ्या फुलांचे झाड होते. एका फोटोत तर गुलमोहराच्या फुलांमध्ये पोपट चोचीत पाकळी घेतलेला आला.
आता परत दुसऱ्या घरी जाणार होतो. पोपट तर नक्कीच कावरेबावरे होतील तांदूळ दिसले नाही तर. बघुयात नवीन घरी ते.