सहज ग्यालेरीत उभी होते;नारळाच्या पानातून दिसणारी चंद्राची नाजूक कोर जणू काही मला खुणावत होती. सुंदर सुखद वाऱ्याची झुळूक आणि तिने बरोबर आणलेले क्षण उगीचच मनाला हुरहूर ,ओढ लावत होते. ती कोर हे सार मला आठवण करून देत होती आणि मग मला ते क्षण आठवले....
अचानक येणारा तो धुंध करणारा सुगंध; त्या वरून ओघळणाऱ्या मोत्याच्या लडी; वाऱ्याच्या झोताने एकमेकात मिसळत होत्या...खाली पडत होत्या.
येणारा सुगंध वेड्या मनाला भुरळ घालत होता;प्रत्येकाला नाही म्हंटले तरी पावसाचे आकर्षण असते.. थोड्याशा गारव्याने उठणारे सुखद शहारे...कधी कोणाबरोबर केलेली धिंगामस्ती नंतर रुसारुसी मग परत एकत्र येणे अशा सुंदर आठवणीत गुंतणे....
कोणाच्यातरी येण्याची ओढ,चाहूल, आणि कुतूहल वाटणे आणि क्षणात सरीवर सरि कोसळू लागणे..मग त्यात मनमुराद चिंब भिजून जाणे...मनाला हवे तेवढे .........पहिला पाऊस असा रुणझुणता..

this one is the best
ReplyDeletekhup chhan lihile aahe!! aavdale!!
ReplyDelete