मनाचा गुंता कधी सुटतच नाही;
कसं कधी कुणात गुंतते कळतंच नाही;
कधी फुलांत तर कधी रानात;
कधी ताऱ्यांमध्ये तर कधी आकाशात;
कधी गाण्यात तर कधी पावसात;
कधी तिच्यात तर कधी त्याच्यात;
कुणाच्या नजरेत तर कधी बोलण्यात;
कुणाच्या स्वप्नात तर कधी कुणाच्या आठवणीत'
होऊन जाते मग मनही अबोल आणि शांत;
घडून जातं सारं मनाच्याही नकळत;
मनाचा गुंता कधी सुटतच नाही;
कुणाच्यातरी आठवणीत रमल्याशिवाय राहवतच नाही.
No comments:
Post a Comment