Sunday, July 1, 2018

पाऊस





रखरखत्या उन्हाळ्यानंतर चाहूल लागते ती पावसाची. प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहात असतो आणि एके दिवशी आकाशात ढगांची गर्दी दाटू लागते, आभाळ भरून येते ,गार वारा सुटतो आणि पावसाचे थेंब बरसू लागतात. मातीचा सुगंध सुटतो.

                                     पहिल्या पावसाच्या सरी अंगावर झेलायला मला खूप आवडते त्यात कागदाच्या होडी बनवून मुलासोबत त्या पाण्यात सोडण्याचा आनंदच वेगळा असतो.



                  प्रत्येक ऋतूंमधले वातावरण छानच असते. पावसाळ्यात सगळीकडे हिरवेगार झालेले असते. फुलं-झाडे  बहरलेली असतात. गुलमोहोर जो आता कमी होत चाललाय लालचुटुक फुलांनी गच्च भरलेला असतो आणि त्याच दिवसात सणांची रेलचेल असते. मग दुर्वा, आघाडा, बेल  पूजेसाठी गोळा करायचे. श्रावण महिन्यातल्या कहाण्या, स्तोत्रे, आरत्या आणि त्यासोबत दरवळणारा उदबत्ती आणि धुपाचा सुवास.

                      ऋतूनुसार भाज्या फळे बदलत जातात. मीठ लावलेली जांभळं, गरम भाजलेल्या भूईमूगाच्या शेंगा, मुगाची खिचडी आणि टमाट्याचे सार, पापड  या दिवसात खायला मजा येते. सगळी धरणी थंड झालेली असते आणि त्याचबरोबर होणारा चिखलही नकोसा असतो.

            आभाळ आलेले असताना कुठेतरी मस्तपैकी फिरायला जाणे तेही गाडीवर. आजच्या धावपळीच्या युगात पावसाचा आनंद घ्यायलाही वेळ मिळत नाही. पण त्यातूनही शक्यतो वेळ काढावाच. कामामुळे आलेला थकवा दूर होतो. पाऊस पडत असताना छान गाणी ऐकत गरमागरम कांदाभजी आणि  चहाचा आस्वाद घेणे, वाह! छानच.


                     "ग्रीष्म संपला वसंत सुरु झाला, थंडगार वारा पुन्हा अंगाशी झोंबू लागला,
             ढगांचा गडगडाट , विजेचा कडकडाट, मराठी मातीचा सुगंध पुन्हा दरवळला,
                       बेभान वारा  येणाऱ्या त्या धारा, या क्षणांचा आहे रंगच न्यारा". (unknown)

Friday, November 24, 2017

थंडीतले दिवस


         


दिवाळी आली कि थंडीची चाहूल लागते. पहाटे उठून कार्तिक स्नान करायचे. अंगणात सडा रांगोळी करायचे,त्यात शेणाने सारवलेले असेल तर मग खूपच छान.


                                            कुठेतरी चुलीवर पाणी तापत असताना त्या लाकडांचा किंवा शेणाच्या गौऱ्यांचा वास, कोंबड्याचे आरवणे,गायींच्या गळ्यातल्या घंट्यांचा आवाज,मंदिरात चाललेल्या काकडा आरतीचा आवाज  ऐकू येतो. मग स्नान करून देवपूजा आणि देवाला आवळ्याची वात लावलेला दिवा.
                                                     या दिवसात खायची पण चंगळ असते, गरम गरम भाकरी त्यावर साजूक तूप नाहीतर लोण्याचा गोळा, वांग्याचे भरीत सोबत मेथीचा खुडा,ठेचा, भुरकी, कांदा, पेरू, आवळे, बोरं,हरियाल बूट, मटारच्या शेंगा आणि हुरडा. शेतात जाऊन हुरडा खाण्याची मजाच वेगळी असते आणि या दिवसात भूक वाढलेलीच असते. डिंकाचे-उडदाचे-मेथ्याचे लाडू खायचे.





           
                      निसर्गाच्या सानिध्यात वेळ देता यावा म्हणून आवळी भोजन याच दिवसात असते.आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करणे म्हणजे आवळीभोजन. चहाचे कॉफीचे घोट घेत घेत सुरेल गाणी ऐकत बसायचे तेही सकाळच्या कोवळ्या उन्हात.
                           आणि यासोबत असते ती गुलाबी कुडकुडणारी थंडी. मस्त शेकोटी करून शेकत बसायचे.





Sunday, July 13, 2014

आई

माझी आई  …। माझी मैत्रीण, माझ्यासाठी सर्व काही. जिच्यासोबत मी सर्व काही शेयर  करते. सर्वात जास्त आईची उणीव मला लग्नानंतर भासली. कोणतीही गोष्ट तिला सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. नेहमीच ती माझी खूप काळजी घेते, मला प्रोत्साहन देते, धीर देते. 

              काहीही घ्यायचे असले कि आम्ही सोबत जातो पण तुला काय घ्यायचे असे विचारले कि "तुला काय घ्यायचे ते घे मला नंतर घेईन" असे म्हणत असते. खायच्या बाबतीतही तसेच. मग मीच तिला बळजबरी खायला लावायची. खूप समाधानी आहे आईचा स्वभाव. एक वेळ मी हट्ट करेल हे घ्यायचे ते घ्यायचे पण ती कधीच नाही. तिला श्रीकृष्णाची खूप आवड आहे तर ती त्याचं काही भेटलं तर आवर्जून घेते. 

        तिने पहिल्यापासून ठरवले होते कि मला चांगलं शिकवायचं आणि स्वतःच्या पायावर उभे करायचे (म्हणजे कमवते  बनवायचे) आणि ते झालेही. तिला जे जे करायला भेटले नाही ते तसं माझं होऊ नये यासाठी ती लक्ष द्यायची. मलाही चित्रकलेची आवड आहे त्यामुळे मला जे पाहिजे ते सामान घेऊन द्यायची. कलाकुसरीच्या वस्तू बनवायला आम्हा दोघींना आवडते त्यामुळे आम्ही नेहमी नवीन काहीकाही बनवतो. आई मला नेहमी त्यात वेगवेगळ्या कल्पना सुचवते आणि कौतुकही करते. 

                             बरेचदा आईवर चिडायचे मी, कधी कधी दुसऱ्या गोष्टींचा राग तिच्यावर निघायचा पण अबोला कधीच धरला नाही तिच्याशी. वेळ मिळेल तेव्हा नवीन पाककृती सुध्दा दोघी आवडीने करून पाहतो. आमच्या सगळ्याच आवडी सारख्या आहेत, फुलझाडं, पक्षी, निसर्गरम्य वातावरण. प्रत्येक सणावाराला सजावट हौशीने करायचो आम्ही. माझ्या रांगोळीचे तिला नेहमी कौतुक वाटते. 

                                           खूप आठवण येते मला तिची. तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवले कि डोळे भरून येतात. लग्न झाले नव्हते तेव्हा लोकं म्हणायचे कि किती दिवस आईवडिलांकडे राहायचे? पण आईवडिलांचा कधीच कंटाळा येत नसतो निदान मलातरी. मला नेहमी ह्या गोष्टींचा राग येतो कि का मुलींनाच लग्न झाले कि जन्मदात्यांना सोडून दुसऱ्या घरी जावे लागते, मुलं तर सोडायला तयार नसतात त्यांच्या आईवडिलांना. 

           आईकडे गेले कि तिच्या मांडीवर डोके ठेवून पडले कि मला खूप शांत वाटते. जन्मोजन्मी मला हेच आईवडील लाभावे. माझ्या भावानेदेखील माझ्यासाठी खूप केले आहे आणि अजूनही करतोच. माझे नातेवाईकहि वेळोवेळी मदतीला येतात, प्रसंगी धीरही देतात. आईची माया काही वेगळीच असते. कोणी काहीही म्हणले तरी मला जेव्हा आईकडे जावे वाटते तेव्हा मी जातेच. पण कितीही वेळ  थांबले तरी तो कमीच वाटतो मला. सासरी निघताना डोळ्यात पाणी येतेच तिच्याही आणि माझ्याही.


Sunday, July 6, 2014

संगीत


 संगीत - निसर्गाने मानवाला  दिलेली देणगी. संगीताने केवळ माणूसच नव्हे तर पशु पक्षी देखील प्रसन्न होतात. "आळविता वेणू धेनु गोळा होती"…………

          तसेच कितीही आजारी माणूस असेल आणि एखादे सुरेख भावपूर्ण गाणे त्याला ऐकवले तर तो देखील आनंदी होतो. संगीत आवडत नाही अशी फार थोडी माणसं असतील. न कळणारे बाळ देखील अंगाई गाईली तर झोपी जाते. एखादे दुखी गाणे कोणी मनापासून गात असेल तर डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.


                शेतात शेतकरी मोट लावतो तेव्हा जे गाणे म्हणतो त्यामुळे त्याचे श्रम त्याला जाणवत नाही तसेच जात्यावर दळताना ओव्या म्हणत केव्हा दळण संपते कळत नाही. संगीत हे सर्व विश्व व्यापून आहे. त्याची अवीट गोडी जो तो आपल्या इच्छेनुसार मनसोक्त घेऊ शकतो.


                                  संगीताने मनातील भावना व्यक्त करू शकतो. प्रेयसीला गाण्यातून गोड हितगुज किंवा राग सांगू शकतो.  आपण एवढे भाग्यवान आहोत कि कितीतरी जुन्या गायक गायिकांनी त्यांच्या सुरेल आवाजात खूप गाणी गाऊन त्यांच्या रेकॉर्ड्स करून ठेवल्या आहेत. त्याचे फक्त जतन करून आपण ती अवीट गोडी चाखली पाहिजे. "ए मेरे वतन के लोगो,लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला,केव्हा तरी पहाटे, मुगल-ए-आझम, जीवन से भरी तेरी आंखे, अशी असंख्य अविस्मरणीय गाणी. 


                                                        संगीताची जादू कुणावर चालली नाही तर नवलच म्हणायचे. माझ्या घरात सगळ्यांनाच संगीताची आवड आहे आणि माझा मामाच तबला, बासरी, पेटी, बुलबुल तरंग, बाजा (मौथोर्गान) शिकवायचा. त्यानेच आम्हालापण शिकविले. लवकरच मी स्वतः कॅसिओवर गाणे वाजवायला शिकले. सुरांचे ज्ञान असले कि वेळ लागत नाही. जेव्हा केव्हा वेळ मिळेल, लहर येईल तेव्हा मी गाणे वाजवते.


                        संगीत एक अशी कला आहे कि त्यामुळे मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो. तणावाखाली असाल नाराज असाल आजारी असाल संगीतामुळे क्षणभर सारे विसरायला  होते. नैराश्य आले असेल तर रोज थोडा वेळ संगीत ऐकावे, मन हलके होते.


       संगीताचे प्रकार ते किती शास्त्रीय,हिंदी, मराठी,इंग्रजी, नाट्यसंगीत,वेगवेगळे राग, संगीतातले रागसुद्धा प्रत्येक प्रहरासाठी वेगवेगळे असतात. पहाटे, सकाळी,दुपारी,संध्याकाळी अशा प्रहरांसाठी ठरलेले राग आहेत.आजकाल नोकरी आणि घर यामधून खूप कमी वेळ मिळतो गाणे ऐकायला. गरोदरपणी मी बाळासाठी बासरी,संतूर वादन आवर्जून ऐकले होते.


                   "संगीत मन को बह्लाए, संगीत जीवन सुलझाये ;

                       संगीत बीना मन अधुरा, उसके बीना जीवन सुना." 


Sunday, June 29, 2014

पक्षी भाग-२

नविन घर दुसऱ्या मजल्यावर होते. त्यामुळे त्याला  ग्यालेरी होती एक. तिथेच दाणे व पाणी ठेवायची जागा केली. यावेळी ज्याचा कधी विचारही केला नव्हता ते पाहायला मिळाले. १-२ पोपट यायला लागले आणि हळूहळू ४-६-७ पोपट जमायला लागले.  ग्यालेरीजवळ नारळाचे झाड होते तिथे फांदीवर काही विजेच्या तारांवर येउन बसायचे. हळूच कोणी नाही याचा अंदाज घेत कट्ट्यावर यायचे. सकाळ,दुपार,संध्याकाळ पोपट येउन बसायचे. चिमण्यांसाठी जे तांदूळ ठेवायचो ते पोपट खायचे. अगदी कडकड आवाज करत. मग त्यांच्यासाठी खास रेशनचे तांदूळ आणून ठेवायचो. पोपटाला हिरवी मिरची, पेरू आवडतो म्हणतात पण हे पोपट ते सोडून फक्त तांदूळ खात होते. 

      एका पोपटाला गळ्यावर लाल डाग होता. त्याला दुसरा पोपट खाऊ दयायचा नाही. जवळ आला कि चोच मारायचा. तांदूळ संपले कि पोपट खूप आवाज करायचे. सकाळी तर सारखा पोपटांचाच आवाज असायचा. कबुतरे,पारवे, बुलबुल पक्षी,साळुंक्या, चिमण्यापण यायला लागल्या. कबुतरांना पोपट घाबरायचे. ते पोपटांना खाऊ द्यायचे नाही. उडवून लावायचे. 

             
                                           खारुताई अजून आली नव्हती. यावेळी खिडकीतून खूप videos आणि photos काढले. हळूहळू ते आम्ही असताना यायचे पण घाबरतच आणि लगेच उडून जायचे. नारळाच्या फांदीवर बसून वाट पाहायचे आम्ही जाण्याची. घरी येणाऱ्या प्रत्येकाला मजा वाटायची पोपट पाहायला. हे घर सोडण्याच्या काही दिवस आधी खारुताई आली होती एक दोनदा.त्याचबरोबर भारद्वाज सुद्धा खूप वेळा येउन गेला. तो पोळी खायचा. कावळापण पोळी खायचा पण ती पोळी तो पाण्यात बुडवून खायचा.

                   ग्यालेरीसमोर मस्त गुलमोहर फुललेला असायचा. त्याच्याखाली बिट्टीच्या पिवळ्या फुलांचे झाड होते. एका फोटोत तर गुलमोहराच्या फुलांमध्ये पोपट चोचीत पाकळी घेतलेला आला. 

                                   आता परत दुसऱ्या घरी जाणार होतो. पोपट तर नक्कीच कावरेबावरे होतील तांदूळ दिसले नाही तर. बघुयात नवीन घरी ते.





 

Sunday, June 22, 2014

पक्षी भाग-१

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेउनी जति….

                              ह्या अशाच चांगल्या आठवणी घेऊन आम्ही नव्या घरात जाणार होतो. मला आणि आईला चिमण्यांची भारी हौस.जिथे राहायला जाऊ तिथे ह्यांचा शोध घेत असु,म्हणजे ते येतील अशा ठिकाणी दाणे, पोळी, तांदूळ, मुरमुरे, पाणी असं काहीतरी ठेवतो. असच ह्या घरात आल्यावर आम्ही केलं. पहिले काही दिवस इकडे पक्षी खूप कमी यायचे. नंतर नंतर जेव्हा आम्ही झाडांना पाणी घातलं. ती हिरवीगार झाली, फुलं आली तेव्हा चिमण्यांचे आगमन सुरु झाले.    


                                            आता तर हळूहळू खाऱ्या चिमण्या, खारुताई, पारवे, साळुंक्या, बुलबुल पक्षी आणि इतर चिमण्या येऊ लागल्या. खरंच पक्ष्यांची शाळा भरल्यासारखे वाटले ना! दिवसभर त्यांचा किलबिलाट चालू असायचा. त्यांच्यामुळे सकाळ व संध्याकाळची वेळ खूप रम्य वाटते.मग सुट्टीच्या दिवशी त्यांना बघत बसायचे मी. पोळीसाठी तर त्यांची भांडणं सुध्दा व्हायची.४-५ बोळके आणि एक वाटी भरून त्यांना पाणी ठेवलेले असायचे. एक चिमणी तर त्या वाटीत बसून आंघोळच करायची आणि नंतर मस्तपैकी पंख फडफडवायची. संध्याकाळी आम्ही झाडांवर पाणी मारत असू म्हणजे पानं जर टवटवीत दिसायची. एक काळी चिमणी रोज ब्रम्हकमळच्या पानांवर अक्षरशः लोळायची.तिला खूप छान गार वाटायचे. आतातर त्यांना आमचा सराव झाला होता. त्या अगदी आमच्या अवतीभवती फिरायच्या.

                   कित्येकदा वाटायचे कि हे कॅमेऱ्यात साठवून ठेवावे पण जेव्हा घेऊन बसायचे तेव्हा ह्या गायब! एकदा असंच कॅमेरा घेऊन बसले, पाणी पीत असलेल्या चिमणीचा फोटो काढायला पण तितक्यात ती
उडाली पण एक खारुताई येउन बसली, चला खारुताई तर आली फोटोत. एखादे दिवशी थोडा उशीर झाला ना पोळी टाकायला कि लगेच ह्यांचा चिवचिवाट जोरात सुरु व्हायचा,जणू काही हाकाच मारत आहेत.  
      
                                      आतातर हे घर सोडून दुसऱ्या जागी जायचे होते, काही दिवसांनी इथे दाणे टाकायला कोणी नसेल. त्यांनाही आठवण येईल आमची नाही का? एखाद्याला जीव, लळा लावायला किती वेळ लागतो आणि सोडून जायला काहीच नाही.

                             सध्या प्रदूषणामुळे, मोबाईलमुळे पक्षी खूप कमी होत आहेत. निदान आपण थोडे दाणे पाणी देऊ जेणेकरून ह्यांचं अस्तित्व टिकून राहील.

                       आता पुन्हा नव्याने नव्या जागी चिमण्यांशी मैत्री करावी लागेल कारण 
त्यांच्याशिवाय आम्हाला करमेल कसे बरे! 

Saturday, May 24, 2014

फुलांचं सौंदर्य






  फुलांचं सौंदर्य अप्रतिम आहे. सर्वात जास्त कोणतं फुल आवडतं म्हणल्यावर पहिले आठवतो तो म्हणजे गुलाब,अनेक रंगांचा गुलाब,पण मग मोगऱ्याचा सुगंध येतो. त्याला पाहून आपोआप  गजरा  माळावा वाटतो. तसं पाहिलं तर गजरा म्हणलं कि जाई,जुई,कुंदाची फुले एका पाठोपाठ एक दिसू लागतात. हिरव्या वेलीवर छान डोलताना पाहात मन प्रसन्न होते. पण मग चाफा? झाडावर एकही पान नसताना सुद्धा बहरून येतो.  मंद सुवासाचा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा. मला शेवंतीची फुलेही  आवडतात. शेवंतीची  वेणी दिसली कि घेतल्याशिवाय राहवत नहि. अबोलीला वास नसतो तरीपण नाजूक केशरी फुले उठून दिसतात. पुष्पगुच्छ म्हणलं  कि निशिगंध आलाच. वा! किती सुरेख सुवास दरवळत राहतो त्याचा . एका मागोमाग एक फुले आठवायला लागतात. जास्वंदी, दुधमोगरा, कन्हेर,लिली,कमळ, पारिजात,झेंडू,कर्दळी,ब्रह्मकमळ,गोकर्ण     कितीतरी असंख्य फुलांच्या जाती आहेत,त्यातही विविध रंगांच्या छटा. प्रत्येकाचं सौंदर्य निराळेच. मग  कसं सांगणार कोणतं सर्वात जास्त आवडतं?

                              मला नेहमीचं वाटतं कि अंगणात छान बाग असावी, त्या बागेत निरनिराळी फुलझाडे असावी. सकाळ संध्याकाळ थंडगार हवेत झोका घेत घेत त्यांचं सौंदर्य न्याहाळत बसावं. ह्यातून मिळणारा आनंद खूप प्रसन्नता, स्फूर्ती देणारा असेल. फुलापानांची ओळख व्हावी व त्याची जोपासना करावी म्हणूनच प्रत्येक सणवाराला,कार्यक्रमाला,देवाला आवडतात म्हणून वाहण्याची प्रथा  आहे.

             प्रत्येकानेच हे निसर्गाचं सौंदर्य जपायला हवे. ह्यानेच तर निसर्गाचा समतोल राहायला  मदत होत असते.            

Thursday, February 23, 2012

मंद गार वाऱ्याची झुळूक, पानांची सळसळ; कुठूनतरी येणारा तो फुलांचा सुगंध,सगळीकडे पसरलेली निरव शांतता, आकाशातल्या चांदण्या त्यातली एखादी सर्वात तेजस्वी आणि चंद्राजवळ असणारी त्याचबरोबर मुग्ध करणारे गाणे....                                                        
                      कहे झूम झूम रात ये सुहानी 
                         पिया होले से छेडो दुबारा, 
                       वही कल कि रसिली कहानी...
क्षणभर सगळ्याचा विसर पडलेला..........आजची रात्र काही औरच होती..

Monday, February 13, 2012

Tanha dil


Tanha Dil, Tanha Safar
Dhunde tujhe, phir kyun nazar,
Tanha Dil, Tanha Safar
Dhunde tujhe, phir kyun nazar,
Tanha dil...
Dilkash nazaare dekhe,
Jhilmil sitaare dekhe,
Aankhon mein phir bhi tera chehra hai jawaa,
Kitni barsaate aayi,
Kitni saugate laayi,
Kaanon mein phir bhi goonjein teri hi sada,
Vaade kiye the apna hoga aashiyaan,
Vaadon ka jaane hoga kya,
Tanha Dil, Tanha Safar,

Someone who can say: I'm always with you in all the situations;when nobody hears you that someone remains with you.

Wednesday, February 1, 2012

lyrics

Shaam se aankh mein nami si hai
Aaj phir aap ki kami si hai

Dafhn kardo hamen ki saans mile
Nabz kuch der se thami si hai

Wakt rukta nahin kahin tik kar
Iski aadat bhi aadmi si hai
-Jagjit singh

Sunday, January 29, 2012

२६ जानेवारी

प्रजासत्ताकदिनानिमित्त मला आठवण झाली ती माझ्या शाळेतल्या दिवसांची... त्यावेळेला म्हणजे मी तेव्हा नववीत होते, शाळेत MCC  महाराष्ट्र कॅडेट कोर्स निघाला होता NCC सारखं. त्यासाठी शनीवार व रविवार ठरलेले. शनिवारी tracsuit घालावा लागायचा. शाळेचं  मैदान तसं  बऱ्यापैकी होतं पण तरी गर्दी व्हायची. मग सगळ्यांसोबत वेगवेगळे व्यायाम व्हायचे.
                   
              २६ जानेवारीनिमित्त १ आठवडा आधी  एक स्पर्धा झाली होती परेडची. माझी त्या ग्रुपमध्ये   निवड झाली होती.त्यासाठी रविवारी यावे लागायचे.आमच्या PT  च्या शिक्षिका खूप तयारी करून घ्यायच्या अगदी रोज १-२ तास पण बुडवायला लागायचे, मात्र राहिलेला आभ्यास घरी करावा लागायचाच.
                                                 
                                           आमच्या बाई खूप छान तयारी करून घ्यायच्या. सगळ्यांच्या फक्त टाचा टेकल्या पाहिजेत,हात मुठी बंद आणि सरळ रेषेत एकसाथ आले पाहिजेत.सुरवातीला एकमेकींना हात लागायचे,पाय चुकायचे. सरावानंतर जर चुकले कि पायावर छड्या बसायच्या. मला बसू नये म्हणून मी खूप लक्ष द्यायचे, अगदी घरीसुद्धा सराव करायचे.
                                परेडमध्ये काही मोजक्याच शाळा होत्या.
माझ्या मागच्या मुलीकडून बरेचदा माझा बूट निघायचा. त्यादिवशीपण तिने तेच केलं.
मी पूर्ण परेड तशीच पूर्ण केली.त्याबद्दल बाईंनी कौतुक पण केलं कारण त्यांच्या लक्षात हि गोष्ट आली होती. सगळ्यांना प्रशस्तीपत्रक भेटले होते.


                                                                 काही दिवसांनी आम्हाला युनिफोर्म भेटले. बूट तर सगळ्यांना मोठे आणि एकाचा मापाचे होते मग त्यात स्पंजचे बोळे घालावे लागले होते. राउंड मारताना त्रास व्हायचा मग एक-दोनच मारायचो.
    एकदा सराव चालू असताना पाऊस आला म्हणून आम्ही आडोशाला थांबलो होतो तर बाई लगेच रागावल्या मग काय  तसेच भिजत करावे लागले,सैनिकी शिक्षण ना ते . पण मजा आली होती खूप.
           इच्छा खूप होती सैनिकी क्षेत्रात जायची पण नाही जमलं. निदान काही दिवस का होईना थोडंफार करायला भेटला तेच खूप असा म्हणावा लागेल.                          

Wednesday, January 25, 2012

lyrics

na jaane kyun, hotaa hai ye zindagi ke saath
achaanak ye man
kisi ke jaane ke baad, kare phir uski yaad
chhoti chhoti si baat, na jaane kyun


wohi hai safar, hai nahin
pass mere magar, ab meraa hamsafar
idhar udhar dhoondhe nazar wohi hai dagar

kahaan gayin shaamen madbhari
wo mere, mere wo din gaye kidhar
na jaane kyun, hotaa hai ye zindagi ke saath
achaanak ye man
kisi ke jaane ke baad, kare phir uski yaad
chhoti chhoti si baat, na jaane kyuun ........

Wednesday, January 18, 2012

mann


मनाचा गुंता कधी सुटतच नाही;
कसं कधी कुणात गुंतते कळतंच नाही;

कधी फुलांत तर कधी रानात;
कधी ताऱ्यांमध्ये तर कधी आकाशात;
कधी गाण्यात तर कधी पावसात;
कधी तिच्यात तर कधी त्याच्यात;
कुणाच्या नजरेत तर कधी बोलण्यात;
कुणाच्या स्वप्नात तर कधी कुणाच्या आठवणीत'
होऊन जाते मग मनही अबोल आणि शांत;
घडून जातं सारं मनाच्याही नकळत;

मनाचा गुंता कधी सुटतच नाही;
कुणाच्यातरी आठवणीत रमल्याशिवाय राहवतच नाही.

Sunday, January 15, 2012



सहज ग्यालेरीत उभी होते;नारळाच्या पानातून दिसणारी चंद्राची नाजूक कोर जणू काही मला खुणावत होती. सुंदर सुखद वाऱ्याची झुळूक आणि तिने बरोबर आणलेले क्षण उगीचच    मनाला हुरहूर ,ओढ लावत होते. ती कोर हे सार मला आठवण करून देत होती आणि मग मला ते क्षण आठवले....
                                 अचानक येणारा तो धुंध करणारा सुगंध; त्या वरून ओघळणाऱ्या मोत्याच्या लडी; वाऱ्याच्या झोताने एकमेकात मिसळत होत्या...खाली पडत होत्या.
येणारा सुगंध वेड्या मनाला भुरळ घालत होता;प्रत्येकाला नाही म्हंटले तरी पावसाचे आकर्षण असते.. थोड्याशा गारव्याने उठणारे सुखद शहारे...कधी कोणाबरोबर केलेली धिंगामस्ती नंतर रुसारुसी मग परत एकत्र येणे अशा सुंदर आठवणीत गुंतणे....
                                             कोणाच्यातरी येण्याची ओढ,चाहूल, आणि कुतूहल वाटणे आणि क्षणात सरीवर सरि कोसळू लागणे..मग त्यात मनमुराद चिंब भिजून जाणे...मनाला हवे तेवढे .........पहिला पाऊस असा रुणझुणता..